‘स्वीप’अंतर्गत नोडल अधिका-यांकडून आढावा दिव्यांगांचे 100 टक्के मतदान होण्यासाठी नियोजन - जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी.



 

‘स्वीप’अंतर्गत नोडल अधिका-यांकडून आढावा

दिव्यांगांचे 100 टक्के मतदान होण्यासाठी नियोजन

-           जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी.

अकोला, दि. 18 : दिव्यांग मतदानाच्या टक्केवारीत राज्यात अग्रेसर असल्याने अकोला जिल्ह्याला 2019 मध्ये पुरस्कार मिळाला होता. ही गौरवशाली परंपरा कायम राखावी व मतदानाच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्यात योगदान द्यावे, असे आवाहन ‘स्वीप’च्या नोडल अधिकारी तथा जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी. यांनी आज येथे केले.

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग संघटना व शाळा यांची संयुक्त बैठक राजर्षी शाहू महाराज सभागृहात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा समाजकल्याण अधिकारी पी. डी. सुसतकर, जिल्हा समन्वय अधिकारी गजानन महल्ले आदी यावेळी उपस्थित होते.  

 

जिल्ह्यात दिव्यागांचे 100 टक्के मतदान व्हावे यासाठी दिव्यांग संघटना व शाळाचालकांशी चर्चा करण्यात आली.  तालुका स्तरावर रथ तयार करून, तसेच पथनाट्य, व्हिडीओ आदी माध्यमातून मतदान करण्याबाबत प्रचार करण्याचा निर्णय झाला.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ