अनाथांना कागदपत्रे मिळवून देण्यासाठी पंधरवडा उपक्रम

 अनाथांना कागदपत्रे मिळवून देण्यासाठी पंधरवडा उपक्रम

अकोला, दि. 1 : अनाथ मुलांना विविध आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्यासाठी महिला व बालविकास विभागातर्फे पंधरवडा राबविण्यात येत आहे. अनाथ प्रमाणपत्र, तसेच इतर कागदपत्रांची आवश्यकता असलेल्या अनाथ मुलांनी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले आहे.

अनाथ मुलांना आधारकार्ड, शिधापत्रिका, जात दाखला, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचा दाखला, मतदानकार्ड आदी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम महसूल विभागाच्या समन्वयाने राबविण्यात येत आहे. ज्या मुलांनी अनाथ प्रमाणपत्र मिळवले आहे, त्यांनी आधारकार्ड, शिधापत्रिका व इतर कागदपत्रे उपलब्ध नसल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयात संपर्क साधावा. ज्यांना अद्याप अनाथ प्रमाणपत्र मिळाले नाही, त्यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन श्री. पुसदकर यांनी केले.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ