टपाली मतपत्रिकेसाठी विहित नमुना वेळेत भरणे आवश्यक

 

 

टपाली मतपत्रिकेसाठी विहित नमुना वेळेत भरणे आवश्यक



अकोला, दि. 27 : लोकसभा निवडणूकीत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करू इच्छिणा-या कार्यरत कर्मचा-यांनी विहित नमुना अधिसूचना निघाल्यानंतर पाच दिवसांत भरून देणे आवश्यक आहे, अशी सूचना निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.

अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजय पाटील आदींनी यावेळी टपाली मतपत्रिकेच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही, निवडणूक आयोगाच्या विविध सूचना व निर्देश याबाबत आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.

अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयांना टपाल मतपत्रिकेचे नमुना 12 डी पुरविण्यात आले आहेत. ज्या अधिकारी व कर्मचा-यांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करायचे आहे, त्यांनी हा नमुना भरून त्यांच्या कार्यालयप्रमुखांकडे द्यावा, अशी सूचना श्री. सिद्धभट्टी यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर (www.akola.gov.in ) नमुना 12 डी उपलब्ध करून दिला आहे. निवडणुकीची अधिसूचना निघाल्यावर पाच दिवसांच्या आत नमुना भरून देणे आवश्यक आहे, असे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ