अकोला जिल्हा ग्रंथोत्सव आजपासून

 

अकोला जिल्हा ग्रंथोत्सव आजपासून

अकोला दि.20 : ग्रंथालय संचालनालय व जिल्‍हा ग्रंथालयातर्फे अकोला जिल्हा ग्रंथोत्सव उद्यापासुन (21 मार्च) जिल्हा ग्रंथालयात आयोजित करण्यात आला आहे. त्यात दि. 22 मार्चपर्यंत विविध कार्यक्रम होतील.

ग्रंथोत्सवाचे उद्घाटन गुरूवारी सकाळी 11 वाजता जेष्ठ साहित्यिक प्रतिमा इंगोले यांच्या उपस्थितीत होईल. दु. 2 वाजता ‘वाचन संस्कृतीवर सोशल मिडीयाचा प्रभाव’ या परिसंवादात ग्रंथमित्र एस.आर. बाहेती, डॉ. स्वाती दामोदरे, प्रा. अशोक सोनोने, मनोज देशमुख आदी सहभागी होते.

शुक्रवारी सकाळी 11 वाजता ‘स्पर्धा परीक्षेतील आव्हाने’ या परिसंवादात नितीन शेकोकार व अनिल हांडे मार्गदर्शन करतील. दु. 1 वाजता हर्षदा इंदाने या ‘बाईपण भारी देवा’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर करतील. दु. 3 वाजता वाचन संस्कृतीत सार्वजनिक ग्रंथलयाचे योगदान या परिसंवादात अनुराग मिश्र, राम मुळे, राजेश डांगटे, भास्करराव पिलात्रे सहभाग घेतील. दु. 4 वाजता समारोप होईल.

साहित्यप्रेमी व वाचकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ