‘आरटीओ’ कार्यालय सुट्ट्यांच्या दिवशीही सुरू राहणार

 ‘आरटीओ’ कार्यालय सुट्ट्यांच्या दिवशीही सुरू राहणार

अकोला, दि. 28 : मार्चअखेर नव्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होण्याची शक्यता व महसूली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय दि. 29 ते 31 मार्च या सार्वजनिक सुट्ट्यांच्या  कालावधीत सुरू राहील.

शुक्रवार ते रविवार या तिन्ही दिवशी नवीन वाहन नोंदणी,  करवसुलीची प्रक्रिया, इतर परिवहनविषयक कामकाज, थकित करवसुली खटला विभाग आदी कामे सुरू राहतील. त्यामुळे नवीन वाहन खरेदीदारांना या काळात वाहन नोंदणी करून घेता येणार आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी केले आहे.

०००   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा