सामाजिक समता सप्ताहात मार्जिन मनी कार्यशाळेचे आयोजन

 

सामाजिक समता सप्ताहात मार्जिन मनी कार्यशाळेचे आयोजन

अकोला, दि. 13 : समाजकल्याण कार्यालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहात स्टँडअप इंडिया योजनेत मार्जिन मनी उपक्रमाबाबत कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे शुक्रवारी झाली.

जिल्ह्यातील युवक उद्योजक व तरूणांसाठी स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत मार्जीन मनी पुरविण्याच्या योजनेबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. सहाय्यक आयुक्त एम.जी. वाठ हे कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते. युवक उद्योजक रणजीत सरदार व जिल्हा महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक श्री. धांडे, संत रविदास आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. वटे आदी उपस्थित होते. स्थानिक नवउद्योजक युवक उपस्थित होते.

उपस्थित युवक व विध्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी व शासनाच्या उपलब्ध योजनांची माहिती देऊन युवकांनी उद्योजकतेकडे वळावे यासाठी मार्गदर्शन कार्यशाळेद्वारे करण्यात आले. स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत मार्जीन मनी योजनांचे लाभ देण्यात आलेले जिल्ह्यातील लाभार्थी रणजित सरदार यांचा विभागामार्फत सत्कार करण्यात आला. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळामार्फत पात्र लाभार्थी यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक समाजकल्याण निरक्षक उमेश वाघ यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समतादूत मनिष चोटमल यांनी केले तर आभार प्रदर्शन शिरसाट यांनी केले.

सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कर्मचारी व समतादुत यांनी अथक परिश्रम केले. वरिष्ठ समाजकल्याण निरिक्षक जी. आर. वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा