खरीप पूर्वतयारीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा


 खरीप पूर्वतयारीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा 


निविष्ठांची उपलब्धता ठेवा; गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाई करणार

जिल्हाधिकारी वर्षा मीना


अकोला, दि. २४ : खरीप हंगामात शेतकरी बांधवांना बियाणे, खते, कीटकनाशके यांची कमतरता भासू देऊ नये, तसेच बोगस बियाणे, खते, किटकनाशक यांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी  येथे दिले.



खरीप पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा जिल्हाधिका-यांनी गुरुवारी बैठकीद्वारे घेतला. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, कृषी उपसंचालक हरीश देशमुख, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद डॉ. तुषार जाधव आदी यावेळी उपस्थित होते. 

बियाणे विक्रीत कुठेही गैरप्रकार घडता कामा नये. त्यासाठी कृषी भरारी पथके कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. बियाण्याची गुणवत्ता, बियाणे व इतर निविष्ठा उपलब्धता यादृष्टीने परिपूर्ण नियोजन व्हावे, असेही निर्देश त्यांनी दिले.


अकोला जिल्ह्यात खरीपासाठी २०२५ या वर्षात ४ लक्ष ३१ हजार ८८४ हे. क्षेत्र होते. आगामी हंगामासाठी प्रस्तावित क्षेत्र ४ लक्ष ३७ हजार १०० हे. आहे. येत्या खरीप हंगामासाठी ६५ हजार १०६ क्विंटल इतकी बियाण्याची संभाव्य मागणी आहे. त्याचप्रमाणे, कापूस पिकाचे संभाव्य क्षेत्रफळ १ लक्ष ४५ हजार हे. असेल. बी.टी. कापूस बियाण्याची संभाव्य मागणी ७ लक्ष २५ हजार पाकिटे आहे. सोयाबीन बियाणे १ लक्ष ७ हजार ४८२ क्विं. असे नियोजन आहे. खतांचा आज रोजीचा शिल्लक साठा ४१ हजार ९०५ मे. टन आहे. आवश्यकतेनुसार निविष्ठा जिल्ह्यात प्राप्त करून घेऊन कुठेही उणीव भासणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा