पुढील २ दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

 

पुढील २ दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता

दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

अकोला, दि. २४ : जिल्ह्यात २५ ते २७ एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. त्यानुसार नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

दु. १२ ते ४ दरम्यान उन्हात बाहेर जाणे टाळा. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळा. उन्हात वाहने शक्यतो चालवू नये. ज्वलनशील पदार्थापासून दूर राहावे. लहान मुले व पाळीव प्राण्यांना दरवाजा बंद असलेल्या वाहनात किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.

तहान असो किंवा नसो; भरपूर पाणी प्यावे. अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. पशुधनास तसेच पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे, तसेच पुरेसे पिण्याचे पाणी देण्यात यावे, आदी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा