वनपट्टा धारक शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी नोंदणी मोहीम सुरू नागरी सुविधा केंद्रामार्फत राज्यभर नोंदणी; कोणतेही शुल्क नाही

 

 

वनपट्टा धारक शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी नोंदणी मोहीम सुरू

नागरी सुविधा केंद्रामार्फत राज्यभर नोंदणी; कोणतेही शुल्क नाही

 

अकोला, दि. १३ : राज्यात डिजिटल कृषी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ॲग्रीस्टॅक  योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी नोंदणी अनिवार्य करण्यात आलेला आहे.

वनहक्क अधिनियम, २००६ अंतर्गत अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी समुदायांना त्यांच्या वनजमिनीवरील हक्क प्रदान करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील वनपट्टा धारक शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

वनपट्टा धारक शेतकऱ्यांनी आपल्या जवळील नागरी सुविधा केंद्र येथे भेट देऊन आवश्यक  कागदपत्रांसह शेतकरी आयडी नोंदणी करून घ्यावी. या नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. शेतकरी नोंदणी झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या विविध योजना, अनुदान, पीकविमा, नैसर्गिक आपत्ती सहाय्य तसेच इतर डिजिटल कृषी सेवांचा लाभ सुलभपणे मिळण्यास मदत होणार आहे.

000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा