सामाजिक समता सप्ताहात विविध कार्यक्रमांची रेलचेल
सामाजिक समता सप्ताहात विविध कार्यक्रमांची रेलचेल
अकोला दिनांक 13 : सामाजिक
समता सप्ताहात वक्तृत्व स्पर्धा, भीमगीत गायन स्पर्धा व संविधान जागर आदी कार्यक्रम
घेण्यात आले.
सर्वाना समान न्याय,समता व बंधुत्वाच्या
विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांची जयंती राज्यभरात दि.08 एप्रिल 2026 पासुन सलग सात दिवस अभिनव पध्दतीने
साजरी करण्याचे नियोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केले आहे.
याच
कार्यक्रमाचा एक भाग म्हणुन आज दिनांक 10 एप्रिल 2026 ते दिनांक 13 एप्रिल 2026
रोजी अकोला जिल्हयामध्ये सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,अकोला व श्री.शिवाजी
महाविद्यालय,अकोला यांच्या सयुक्त विद्यमाने समाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचे
निमित्ताने श्री.शिवाजी कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,अकोला येथे भव्य विदर्भस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा व भीमगीत गायन स्पर्धा व संविधान जागर-भारतीय संविधाना विषयी अनुच्छेद,विशेषत:
मुलभुत अधिकारी व मुलभुत कर्तव्ये या विषयी माहिती देणारे व्याख्यान
कार्यक्रम साजरा
करण्यात आला.
सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण विभाग व श्री.शिवाजी
कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,अकोला यांचे संयुक्त विद्यमाने भव्य विदर्भस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा व भीमगीत गायन स्पर्धा व संविधान जागर-भारतीय संविधाना विषयी अनुच्छेद,विशेषत:
मुलभुत अधिकारी व मुलभुत कर्तव्ये या विषयी माहिती देणारे आयोजीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन
डॉ.राामेश्वर भिसे, प्राचार्य श्री.शिवाजी महाविद्यालय,अकोला. कार्यक्रमाचे प्रमुख
वक्ते मा.श्री.विशाल नंदागवळी,संचालक,सार्थक वक्तृत्व ॲकॅडमी,अकोला तर प्रमुख
उपस्थिती मा.प्रा.सुरेशराव राऊत,(सदस्य) मा.श्री.प्रशांतभाऊ देशमुख,(सदस्य)
मा.डॉ.सुभाषचंद कोरपे,विशेष निमंत्रित , मा.श्री.शेषरावजी काळे, ,(सदस्य) शाळा
समिती, मा.श्री.अशोकराव देशमुख ,(सदस्य) शाळा समिती,प्रमुख पाहुणे
मा.श्री.एम.जी.वाठ,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,अकोला हे असुन तर प्रमुख वक्ते
मा.श्री.सुबोध धुरंधर,अमरावती व उपस्थिती डॉ.संजय तिडके,डॉ.आशिष राऊत, डॉ.नाना
वानखडे,डॉ.ममता सांगोले,डॉ.नितीन मोहोड,मा.श्री.राजेश गिते तर उदघाटक डॉ.गजानन
वजीरे व डॉ.अश्विनी बलोदे हे होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा