मैदानावरील रणरागिणी: अकोल्यातील महिला खेळाडूंची झेप
मैदानावरील रणरागिणी: अकोल्यातील महिला खेळाडूंची झेप
अकोला : महाराष्ट्राच्या मातीला खेळाचा मोठा वारसा लाभला आहे. अकोला जिल्ह्याने कला, साहित्य आणि राजकारणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अलीकडच्या काही वर्षांत अकोल्यातील मुलींनी परिस्थितीवर मात करून मैदाने गाजवायला सुरुवात केली आहे.
अकोला जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात अनेक महिला खेळाडूंनी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. महिला सक्षमीकरणाअंतर्गत महिला खेळाडूंना राज्य शासनाने जिल्हा क्रीडा कार्यालय व विविध माध्यमातून सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. क्रिकेट असो वा ॲथलेटिक्स, अकोल्याच्या कन्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर पदकांची लयलूट केली आहे.
प्रशिक्षक संदीप ढोके, बॉक्सिंग कोच सतीशचंद्र भट, बुद्धिबळ प्रशिक्षक जितेंद्र अग्रवाल, क्रिकेट प्रशिक्षक प्रवीण मुळे यांच्यासारखे उत्तमोत्तम प्रशिक्षक क्रीडा क्षेत्रात चांगले काम करत आहेत. राष्ट्रीय पदकविजेता यमिनी ठाकरे यांनी ॲथेलॅटिक्समधील 10 हजार मी. स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला. खुशी तायडे यांनी 100 मी. व 200 मी. स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व केले. ऑल इंडीया इंटर युनीवरसीटी स्पर्धेमध्ये अकोला जिल्ह्याची नंदिनी गायकवाड इने हॅमर र्थो या क्रीडा प्रकारामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व केले. पलक सुर्वे हिने 4 -400मिटर रिलेमध्ये जिल्ह्याला सिल्वर मेडल प्राप्त करुन दिले.
बुद्धिबळातही जिल्ह्याची कामगिरी चांगली असून, अर्पिता करवते हिने अंडर 17 गर्ल्स कॅरम स्पर्धेत सहा जिल्ह्यात उत्तीर्ण होत सहभाग नोंदवला. संस्कृती वानखडे हिने बुध्दिबळ स्पर्धेत चंद्रपुर,दिल्ली, नांदेड व मेरठ येथे दोन सुवर्ण व दोन कांस्य पदक घेऊन जिल्ह्याचे नाव उंचावर नेले.
अकोला क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून शालेय, राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत जिल्ह्यातील विद्यार्थिनींनी उत्तम कामगिरी केली. इशिका झांबरे, अक्षरा खंडारे, गार्गी राऊत, कनक अग्रवाल, समीक्षा सोळंके, सुहानी बोराडे, श्रद्धा राहटकर, श्रद्धा खोब्रागडे, अनुष्का गुप्ता यांनी विविध पदके मिळवली.
विदर्भ क्रिकेट असोसिएशन ऑफ नागपुर युथच्या माध्यमातून जिल्ह्यातील दोन महिला खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. प्रगती सुर्यवंशी हिने अंडर फिफ्टीन स्पर्धेत विदर्भाकडून खेळत 85 धावा मिळवल्या. पहिल्या वुमेन्स गजदर लीग सीजन वनमध्येही चांगली कामगिरी केली. आदिती चौखंडे हिनेही उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्याचे नाव उंचावर नेले आहे
'महिला प्रीमियर लीग'च्या आगमनामुळे विदर्भातील खेळाडूंसाठी व स्थानिक क्लब स्तरावर खेळणाऱ्या मुलींमध्ये एक नवी उमेद निर्माण झाली आहे. शासनाच्या ५ टक्के खेळाडू आरक्षणांतर्गत जिल्ह्यातील अनेक महिला खेळाडूंनी पोलीस विभाग, महसूल विभाग आणि शिक्षण विभागात यश मिळवले आहे.
- मंदार कुलकर्णी, अकोला
#नारीशक्ती
०००


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा