जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिन साजरा
जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिन साजरा
लाभार्थी प्रमाणपत्रांचे वितरण
नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा पुरवाव्यात
-निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे
अकोला, दि. २८ : नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर, जबाबदार आणि पारदर्शक प्रशासन ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून वाटचाल व्हावी. नागरिकांना सेवा पुरविताना विहित कालमर्यादेचे पालन व्हावे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांनी आज येथे केले.
लोकसेवा हक्क दिनानिमित्त कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड, जलसंधारण अधिकारी सचिन वानरे, अधिक्षक श्याम धनमने, समाजकल्याण सहायक आयुक्त मारोती वाठ आदी उपस्थित होते.
यावेळी विविध विभागांच्या ऑनलाइन सेवांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना वेळेत व पारदर्शक पद्धतीने शासकीय सेवा देण्यासाठी वचनबद्ध राहण्याची लोकसेवा हक्क शपथ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी घेतली.
पारदर्शकता, तत्परता व लोकाभिमुखता ही त्रिसुत्री आपल्या कामात अवलंबवावी, असे आवाहन श्री. मालठाणे यांनी केले.
अकोला शहरातील ऑफिसर्स क्लब येथे शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहनही श्री. मालठाणे यांनी केले
यावेळी महसूल, कृषी आदी विभागांच्या विविध योजनांच्या प्रमाणपत्रांचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले.
०००
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
%20-%20Copy.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा