डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिबिर ३३५ जात वैधता प्रमाणपत्रे वितरीत

 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिबिर

३३५ जात वैधता प्रमाणपत्रे वितरीत    

अकोला दि. १७ :  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जात वैधता प्रमाणपत्र वितरण शिबिर घेण्यात आले. त्यात ३३५ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. 

प्रकरणांसोबत जोडण्यात आलेल्या आवश्यक कागदपत्रानुसार परिपुर्ण असलेल्या प्रकरणाप्रमाणे समितीने निर्णय घेऊन तातडीने प्रमाणपत्रे वितरित केली. ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने वितरीत करण्यात आले आहे.

त्रुटी पुर्ततेअभावी प्रलंबित असलेल्या प्रकरणे निकाली काढण्याकरीता १७ व २० एप्रिलला विशेष त्रुटी पुर्तता कार्यशाळा घेण्यात येत असून, विद्यार्थ्यांकडून आवश्यक पूर्तता करून घेतली जाईल.  

तसेच ११ वी १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी व व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेऊ इच्छित असलेले विद्यार्थी पुढील प्रवेशापासुन वंचित राहु नये ही बाब लक्षात घेता जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरीता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, निमवाडी, अकोला या कार्यालयात जास्तीत जास्त संख्येने स्वतः उपस्थित राहुन नवीन प्रकरणे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर करण्यात यावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष जितेंद्र काकुस्ते, उपायुक्त तथा सदस्य  अमोल यावलीकर व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मनोज मेरत यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा