जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची सूर्योदय बालगृहाला सदिच्छा भेट

 


जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची सूर्योदय बालगृहाला सदिच्छा भेट

 

अकोला, दि. २ : जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी बुधवारी सूर्योदय बालगृहाला सदिच्छा भेट देऊन प्रवेशित बालकांसोबत संवाद साधला.

जिल्हाधिका-यांनी बालगृहाची पाहणी करून संस्थेच्या कार्याची माहिती जाणून घेतली, संस्था करीत असलेल्या बालकांची विशेष काळजी व संरक्षणाच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. श्री.भय्युजी महाराज यांच्या या संस्थेमार्फत सुरु असलेल्या इतर कार्याची माहिती त्यांनी जाणून घेतली.

जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत यावेळी प्रवेशित बालकांना मिठाई व खेळ साहित्याचे वाटपही झाले. सोलापूर येथील राज्यस्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवासाठी निवड झालेल्या बालकांशी संवाद साधून त्यांनी प्राप्त घवघवीत यशाबद्दल बालकांचे मनापासून कौतुकही केले. संस्थेतील कर्मचारी वर्गासोबत संवादही साधला..

000            

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना