रक्तदान शिबिराला युवकांचा प्रतिसाद
रक्तदान शिबिराला
युवकांचा प्रतिसाद
अकोला, दि. १३ : जिल्हा समाजकल्याण
कार्यालयातर्फे सामाजिक समता सप्ताहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन
येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी अनेक युवकांनी उपस्थित राहून रक्तदान करून
सामाजिक बांधीलकीचा प्रत्यय दिला.
जिल्हयामध्ये सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,अकोला
यांच्यावतीने समाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचे निमित्ताने जिल्हयात आरोग्य
अधिकारी डॉ. अक्षता प्रधान, डॉ. मयुरेश वैराळे
, शिल्पा
तायडे , मयुरी गायगोले यांच्या सहकार्याने जिल्हा रुग्णालय व
महाविद्यालय,अकोला येथे रक्तदान शिबीरामध्ये इच्छुक व्यक्तीनी रक्तदान करुन
कार्यक्रम साजरा करण्यात आला.
त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय
भवन,निमवाडी अकोला येथे सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण विभाग यांचे विद्यमाने
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याबददल महिला मेळावा
साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता म्हणुन
श्रीमती. सपना लांडे मॅडम व्याख्याता (समाज सेवीका) यांनी महिला विषयी अत्यंत मोलाचे
मार्गदर्शन केले व शाहु,फुले,आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांनी महिलासाठी केलेल्या
कार्याबददल उपस्थितांना माहिती दिली. उपस्थित मान्यवरांच्या
हस्ते महापुरुषांचे प्रतिमापूजन व हारअर्पण करून सदर कार्यक्रमास सुरुवात करण्यात
आली, कार्यक्राचे अध्यक्ष- श्री.अमोल
यावलीकर,उपायुक्त(जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,अकोला) हे होते तर प्रमुख
अतिथी म्हणून श्री.अभिजीत काळे साहेब प्रभारी संचालक,(इतर मागास बहुजन कल्याण
विभाग) व श्री.मारोती वाठ साहेब,सहाय्यक आयुक्त, (समाज कल्याण,अकोला) व प्रास्तावाना श्री.गोपाल वाघमारे सर ,वरिष्ठ
समाज कल्याण निरिक्षक हे उपस्थित होते. उपस्थित महिला लाभार्थी/ विध्यार्थ्यांना भारतरत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहु महाराज महात्मा ज्योतीबा
फुले यांनी माहिलासाठी केलेल्या कार्याबाबत माहिती दिली. शासनाच्या उपलब्ध
योजनांची माहिती देऊन उपस्थितांना यासाठी
मोलाचे मार्गदर्शन करुन संबोधित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती.सोनाली तिवारी मॅडम यांनी केले तर आभार
प्रदर्शन श्रीमती. मधुरी रंगारी मॅडम यांनी केले.
०००
.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा