भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम सामाजिक न्याय भवनात मंगळवारी भव्य कार्यक्रम

 

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम

सामाजिक न्याय भवनात मंगळवारी भव्य कार्यक्रम

अकोला, दि. १३ : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे सलग सात दिवस विविध कार्यक्रम होत असून, उद्या (१४ एप्रिल) सकाळी ११ वा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनात भव्य कार्यक्रम होणार आहे.

सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन दि. ८ एप्रिल रोजी करण्यात झाले. आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्ज्वलन करून उद्घाटन झाले. समाजकल्याण उपायुक्त अमोल यावलीकर, सहायक आयुक्त एम. जी. वाठ, गोपाळ वाघमारे आदी उपस्थित होते.

समता सप्ताहात रोज अभिनव व विविध कार्यक्रम होणार आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासाच्या योजनांची माहिती देण्यासाठी कार्यक्रमांची रचना केली आहे. सामाजिक सप्ताह कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतीचे वितरण घरोघर होत आहे. सन २०२६ हे वर्ष महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. चवदार तळे, महाड येथील सत्याग्रहासंबंधी व त्यानुषंगाने मानवी हक्कांचे प्रतिपादन करणारे व्याख्यान, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे, संत गाडगेमहाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्तही उपक्रम घेण्यात आले.

सामाजिक न्याय योजनांच्या लाभाचे प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना वितरणही झाले. दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळावा, तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष असल्याने त्यासंबंधीही उपक्रम घेण्यात आले. त्याचबरोबर, उद्या (१४ एप्रिल) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सकाळी ११ वा. भव्य कार्यक्रम होणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा