विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सर्वंकष प्रयत्न करा जिल्हाधिकारी वर्षां मीना
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सर्वंकष प्रयत्न करा जिल्हाधिकारी वर्षां मीना अकोला, दि. 18: विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्ये सुधारण्यासाठी निपुण कार्यक्रम राबवला जातो. जिल्ह्याची स्थिती फारशी समाधानकारक नसून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षण यंत्रणा व शिक्षकांनी सर्वंकष प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले. महसूल सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय निपुण सुकाणू समितीच्या सभेत त्या बोलत होत्या. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य रत्नमाला खडके, एकात्मिक बालविकास उपमुख्य कार्यकारी अमित रायबोले आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन आणि गणित यासारख्या मूलभूत गोष्टींमध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी निपुण कार्यक्रम राबवला जातो. राज्याच्या क्रमवारीतील जिल्ह्याचे स्थान पाहता या शैक्षणिक स्थितीत बदल घडवून आणणे आवश्यक आहे. त्यामुळे गुणवत्तावाढीसाठी सर्व घटकांनी जबाबदारीने काम करावे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरि...