लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेत 200 व्यक्तींना प्रशिक्षण देणार
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेत 200 व्यक्तींना प्रशिक्षण देणार अकोला, दि. 29 ; साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील कुटुंबांसाठी नाविन्यपूर्ण योजनेत जिल्ह्यातील 200 व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समाजातील कुटुंबांची सामाजिक , आर्थिक उन्नती व्हावी , त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत म्हणून 18 ते 50 वर्षांदरम्यान वय असलेल्या व्यक्तींना व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इच्छूक अर्जदारांनी जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, आरोग्यनगर चौक, नालंदानगरच्या बोर्डाजवळ , कौलखेड रोड. अकोला येथे अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री . ए . वाय . वाडीवे यांनी केले आहे . अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला ( उत्पन्न मर्यादा 3 ...