जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष सुरू
जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष सुरू अकोला, दि. ४ : मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी अर्थसाह्य सहजपणे उपलब्ध व्हावे यासाठी अकोल्यात सहायता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीतील पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष सुरू करण्यात आला आहे. नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या प्रकरणांची माहिती जिल्ह्यातच उपलब्ध होणार आहे, अशी माहिती अधिक्षक श्याम धनमने यांनी दिली. गरजू नागरिकांनी विहित नमुन्यातील अर्ज, आवश्यक कागदपत्रांसह मुख्यमंत्री वैद्यकीय निधी सहायता कक्षात सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ०००