जिल्ह्यात गणेशोत्सव उत्साहात साजरा जिल्हाधिकाऱ्यांनी मानले नागरिकांचे आभार

 


अकोला, दि. ८ : जिल्ह्यात श्री गणेशोत्सव शांततेत व सौहार्द राखून उत्साहात साजरा झाला. कायदा व सुव्यवस्था राखून सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवत गणेशोत्सव पार पाडल्याबद्दल जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी जिल्ह्यातील सर्व गणेशोत्सव मंडळे, गणेशभक्त, संबंधित यंत्रणा व समस्त नागरिकांचे आभार मानले आहेत.

नागरिक व गणेश मंडळांनी केलेल्या सहकार्याने गणेशोत्सव शांततापूर्ण मार्गाने साजरा झाला. पोलीस विभाग, वाहतूक विभाग आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनी अचूक नियोजन, चोख बंदोबस्त, परिश्रमपूर्वक पार पाडलेले कर्तव्य यामुळे  उत्सव सुरक्षित आणि शिस्तबद्ध पार पडला. मंडळांकडूनही सकारात्मक उपक्रमांवर भर देण्यात आला.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गणेशभक्त, सामाजिक संघटना, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था, अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक यांच्या सहकार्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यात येऊन सण उत्साहात साजरा झाला.

सर्व नागरिकांनी गणेशोत्सव शांततेत साजरा करून सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवले.  यापुढील सण–उत्सवांच्या काळातही असेच सौहार्द राखूया व सामाजिक एकता, कायदा सुव्यवस्था अबाधित राखूया, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी केले आहे.

00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा