आदिवासी क्षेत्रात क्षमता विकासासाठी आदि कर्मयोगी अभियान
आदिवासी क्षेत्रात क्षमता विकासासाठी
आदि कर्मयोगी अभियान
अकोला, दि. 9 : धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष
अभियानाला जोडून ‘आदि-कर्मयोगी-उत्तरदायी शासन कार्यक्रम’ केंद्र शासनाकडून राष्ट्रीय
पातळीवर हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यात ४३ गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे.
योजनेत महाराष्ट्रातील २१४ तालुके व ४ हजार ९७५
गावांचा समावेश करण्यात आला आहे. आदिवासींना वैयक्तिक लाभ, तसेच गावपातळीवर सामूहिक
लाभ देण्यात येणार आहे. विविध २५ योजनांचा लाभ मिळवून देण्यात येईल. ‘धरती आबा’ उपक्रमाच्या
यशस्वितेसाठी "आदि-कर्मयोगी-उत्तरदायी शासन कार्यक्रम" राष्ट्रीय पातळीवर
हाती घेण्यात आला आहे. त्याद्वारे आदिवासी भागांमध्ये बहुस्तरीय क्षमता विकास, उत्तरदायी
शासन व्यवस्था स्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे. भारत ग्रामीण उपजीविका फाउंडेशनच्या
सहकार्याने तो राबविण्यात येत आहे, अशी माहिती प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे
यांनी दिली.
त्याबाबत व्यापक विकासकामांचे आराखडे तयार करण्यासाठी
तालुकास्तरीय विविध यंत्रणांच्या अधिका-यांना कार्यशाळेद्वारे प्रशिक्षण देण्यात आले
आहे. अभियानामुळे आदिवासी समाजातील युवक आणि महिलांना नेतृत्वाची संधी मिळेल. स्थानिक
समस्यांवर प्रभावी उपाय शोधले जातील. शासकीय योजना दुर्गम भागात अधिक प्रभावीपणे पोहोचतील.
आदी कर्मयोगी अभियान हे सेवा संकल्प आणि समर्पण या मूल्यांवर आधारित असून आदिवासी समाजाच्या
विकासाला चालना देणारी एक क्रांतिकारी चळवळ ठरणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी श्रीमती
वर्षा मीना यांनी व्यक्त केला आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा