राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिवस दि. १ ऑक्टोबरला साजरा होणार रक्तदान शिबिरांचा उपक्रम ही लोकचळवळ व्हावी - जिल्हाधिकारी वर्षा मीना


 राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिवस दि. १ ऑक्टोबरला साजरा होणार

रक्तदान शिबिरांचा उपक्रम ही लोकचळवळ व्हावी
- जिल्हाधिकारी वर्षा मीना
अकोला, दि. १५ : रक्तदानाच्या कार्यात अधिकाधिक लोकसहभाग मिळविण्यासाठी ‘राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिवस’ दि. १ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येत आहे. ही मोहिम लोकचळवळ व्हावी यासाठी अकोला जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.
`केंद्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयातर्फे देशभर राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिवस साजरा करण्यात येतो. ‘रक्तदान करूया, आशा जागवूया, एकत्रित येऊन जीवन वाचवूया’ असे त्याचे घोषवाक्य आहे.`
जिल्ह्यातून अधिकाधिक रक्तदात्यांची नोंदणी व्हावी म्हणून इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान रक्तदान मोहिम पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या मोहिमेचा भाग म्हणून सोसायटीच्या अकोला जिल्हा शाखेतर्फे डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या सुसज्ज मोबाईल रक्तदान व्हॅन व पथकाच्या सहकार्याने तालुका पातळीवर रक्तदान शिबिरे घेण्यात येणार आहेत.
या मोहिमेत अधिकाधिक लोकांचा सहभाग मिळवावे. अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी या राष्ट्रीय सेवा कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा