माजी सैनिकांसाठी बेळगावात आऊटरिच कार्यक्रम

 

माजी सैनिकांसाठी बेळगावात आऊटरिच कार्यक्रम

अकोला, दि. 22 : जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, दिवंगत सैनिकांच्या पत्नी आणि अवलंबितांसाठी दि. १९ ऑक्टोबरला सकाळी ८.३० ते सायंकाळी ४ या वेळेत कर्नाटकात बेळगाव येथे आऊटरिच कार्यक्रम होणार आहे.

बेळगाव येथील श्री शिवाजी स्टेडियम येथे मराठा लाईट इन्फ्रन्टी  रेजिमेंटल सेंटरद्वारे वीर नारी, तसेच माजी सैनिक यांचा मेळावा आयोजित केला आहे.पेन्शनधारकांना त्यांच्या संरक्षण पेन्शनच्या अनुदान, वितरणाबाबतच्या तक्रारी नोंदवता याव्यात यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

सदर मेळाव्यात लष्कराची २० अभिलेख कार्यालये आणि पीडीए येथील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील कुटूंब निवृत्ती वेतनधारक, माजी सैनिक, दिवंगत सैनिकांच्या पत्नी आणि अवलंबितांना निवृत्ती वेतन (स्पर्श) आणि ईसीएचएस आणि इतर काही समस्या असल्यास संपूर्ण मुळ कागदापत्रासह हजर राहून जास्तीत जास्त या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद शरद पाथरकर यांनी केले आहे.

000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा