सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा ‘एफडीए’ची तपासणी मोहिम

 

सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा

‘एफडीए’ची तपासणी मोहिम

अकोला, दि. 18 : अन्न व औषध प्रशासनातर्फे सणासुदीचा काळ लक्षात घेऊन मोहिम राबविण्यात येत आहे, अशी माहिती सहायक आयुक्त (अन्न) दे. गो. वीर यांनी दिली.

आगामी काळात नवरात्र, दसरा, दिवाळी असा सणासुदीचा काळ लक्षात घेऊन मिठाई, खाद्यपदार्थांची दुकाने तपासण्यात येत आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी यांनी नुकतेच काही अन्न दुकानांची सखोल तपासणी करून एका पेढीचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच तूप, तेल (सोयाबीन, शेंगदाणा तेल व सुपर पामोलिन), मिठाई तसेच इतर अन्न पदार्थांचे नमुने विश्लेषणास्तव घेतले आहेत. त्याबाबतचा अहवाल प्रलंबित असून अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत पुढील कार्यवाही घेण्यात येईल.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा