राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा शिबीरांद्वारे जात पडताळणी त्रृटींचे निराकरण

 

अकोला, दि. 19 : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अकोला या कार्यालयाचे वतीने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त 22, 23, 24 व 29 सप्टेंबर रोजी जात पडताळणी त्रृटी शिबिरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनजिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथे राबविण्यात येत आहे.

सामायिक परिक्षेनंतर उच्च शिक्षण व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित करण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानुसार इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील नविन प्रवेशित विद्यार्थी यांनी अद्याप पर्यंतही जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याकरीता प्रस्ताव सादर करण्यात आले नाहीत अशा विद्यार्थ्यांकरीता या कार्यालयात अर्ज स्विकृतीसाठी विशेष खिडकीचे नियोजन करण्यात आले आहे. जेणेकरून पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यापासून कुठल्याही प्रकारचा विद्यार्थी विद्यार्थीनी वंचित राहणार नाही. महाविद्यालयात ११ वी १२ वी विज्ञान शाखेत प्रवेशीत असलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने मिळण्याकरीता प्रस्ताव स्विकारण्यात येत आहे. तसेच महाविद्यालातील प्राचार्य यांना समान संधी शिबीर आयोजित करून जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी आवश्यक लागणाऱ्या शैक्षणिक व जाती विषयक महसूली पुरावे प्रस्तावासोबत जोडण्याकरीता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे.

त्याचप्रमाणे व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच इयत्ता ११ वी १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना त्रुटी अभावी प्रलंबित असलेल्या प्रकरणाची पुर्तता करण्यासाठी या कार्यालयाकडून ईमेल, एसएमएस व पत्राव्दारे कळविण्यात आले आहे. जेणेकरून पुर्तता करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने या कार्यालयाकडून वितरित करणे सोयीचे होईल. तसेच पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरिता कुठलाही विद्यार्थी वंचित राहणार नाही. सदर शिबिराचा विद्यार्थी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्यात यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीचे उपायुक्त तथा सदस्य यांनी केले आहे.

000000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा