ई भूमिती प्रणाली जिल्ह्यातील जमीन व्यवस्थापनात पारदर्शकता, अचूकता आणि कार्यक्षमतेस चालना देत असून, भविष्यातील नियोजन, संसाधनांचा योग्य वापर आणि नागरिकांना वेगवान सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. – वर्षा मीना, जिल्हाधिकारी, अकोला
ई भूमिती प्रणाली जिल्ह्यातील जमीन व्यवस्थापनात पारदर्शकता, अचूकता आणि कार्यक्षमतेस चालना देत असून, भविष्यातील नियोजन, संसाधनांचा योग्य वापर आणि नागरिकांना वेगवान सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
– वर्षा मीना, जिल्हाधिकारी, अकोला___
जिल्ह्यातील १२ हजार हे. जमिनीचे ’ई-भूमिती’द्वारे यशस्वी डिजिटायझेशन
अकोला, दि. २५ : जिल्ह्यातील शासकीय जमिनी व मालमत्ता यांचे डिजिटायझेशन आणि प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे ’ई-भूमिती’ ही अत्याधुनिक जीआयएस आधारित ’डिजिटल गव्हर्नमेंट लँड अॅसेट मॅपिंग अँड मॉनिटरिंग सिस्टम’ यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आली असून १२ हजार हे. शासकीय जमिनींचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.
या अभिनव उपक्रमांतर्गत ग्राम महसुल अधिकारी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन जमिनींची माहिती मालमत्तेचे नाव, सर्वे नंबर, क्षेत्रफळ, स्थान निर्देशांक, छायाचित्र ही माहिती प्रणालीवर नोंदवितात. मंडळ अधिकारी तपासणी करून ती माहिती प्रमाणित करतात, तर जिल्हाधिकारी स्तरावर संपूर्ण जिल्ह्याचे विश्लेषण, अहवाल व आकडेवारी सहज उपलब्ध होते. तसेच सार्वजनिक पोर्टलवर नागरिकांना मंजूर जमिनींची माहिती नकाशाच्या स्वरूपात पाहण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
आजपर्यंत या प्रणालीच्या माध्यमातून एकूण १२ हजार हेक्टर शासकीय जमिनींची माहिती यशस्वीरित्या अपलोड करण्यात आली असून, जिल्ह्यातील शासकीय जमिनींचे डिजिटल नोंदणीकरण व निरीक्षण करण्याच्या दिशेने हा एक मोठा टप्पा ठरला आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा