जिल्ह्यात ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा होणार
जिल्ह्यात ‘अभिजात मराठी
भाषा सप्ताह’ साजरा होणार
अकोला, दि. २३ : सुमारे अडीच हजार वर्षांपेक्षा प्राचीन समृद्ध परंपरा
असलेल्या मराठी भाषेच्या गौरवार्थ ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ सर्वत्र साजरा होणार
आहे. यानिमित्त जिल्ह्यातील सर्व कार्यालये, बँका, संस्था, शाळा- महाविद्यालयांनी यानिमित्त
विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.
मराठी भाषा विभागातर्फे दि. ३ ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा दिवस जाहीर
करण्यात आला असून, दि. ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात
येणार आहे. प्राचीन आणि जुन्या काळातील ग्रंथांची, लिपींची, भाषा व्यवहाराची, विविध
कलांतील भाषेच्या उपयोगाची अनन्यसाधारण परंपरा मराठी भाषेला आहे. हा समृद्ध वारसा विविध
समाजघटकांसमोर येण्यासाठी सप्ताहात उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व कार्यालये, बँका, संस्था, शाळा- महाविद्यालयांनी यानिमित्त
विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सप्ताहानिमित्त व्याख्यानमाला, दुर्मिळ ग्रंथप्रदर्शन, परिसंवाद, निबंधलेखन,
वक्तृत्व स्पर्धा आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन जिल्हा मराठी भाषा समितीचे
सदस्य सचिव उपजिल्हाधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा