अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करावेत प्रकल्प अधिका-यांचे आवाहन

 

 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी

शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करावेत

प्रकल्प अधिका-यांचे आवाहन

अकोला, दि. 15 : अकोला, वाशिम व बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व अन्य शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठीन महाडीबीटी प्रणालीवर नवीन अर्ज व नुतनीकरणाचे अर्ज भरावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे

मोहनकुमार व्यवहारे यांनी केले आहे.

 

त्यासाठीचे संकेतस्थळ कार्यान्वित झाले आहे. भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज महाडीबीटी संकेतस्थळावर भरावेत. अकरावीपासून पदवी, पदव्युत्तर पदवी, विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास प्रवेशित, तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, कृषी विभाग, पशुधन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभाग आदी विभागांच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अभ्यासक्रमास प्रवेशित अनुसूचित जमातीचे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

अर्जासोबत बोनाफाईड प्रमाणपत्र, जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र,  महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र,  टी.सी., गुणपत्रिका आणि आवश्यक त्या अभ्यासक्रमाकरिता जात वैधता प्रमाणपत्र आदी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

अनुसूचित जमातीच्या सर्व मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. व्यवहारे यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा