‘माविम’च्या भगिनीकडून मसुरीत आयएएस प्रशिक्षणार्थ्यांना धडे





 

 

‘माविम’च्या भगिनीकडून मसुरीत

आयएएस प्रशिक्षणार्थ्यांना धडे

अकोला, दि. १९ : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अकोला लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक सोनाली अंबरते यांनी मसुरी येथे नुकतेच नवनियुक्त आयएएस अधिका-यांना बचत गटांचे कार्य, प्रत्यक्ष फिल्डवरचा अनुभव याबाबत प्रशिक्षण दिले.

मसुरी येथील लालबहादूर शास्त्री प्रशासकीय प्रशिक्षण अकादमी येथे भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रवेशानंतर अधिका-यांचे प्रशिक्षण पूर्ण होते. अकोला येथील लोकसंचालित साधनाचे कार्य, स्वबळावर निर्माण केलेली इमारत, स्वयंसहायता गटांचे जाळे आदी लक्षात घेऊन ‘माविम’च्या व्यवस्थापकीय संचालक राजलक्ष्मी शहा, तसेच प्रशासकीय अकादमीचे अधिकारी शैलेश नवाल यांच्या मार्गदर्शनात अकोला केंद्राच्या व्यवस्थापक सोनाली अंबरते यांची प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली.

त्यानुसार गेल्या आठवड्यात श्रीमती अंबरते यांनी मसुरी येथे जाऊन ‘स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची चळवळ’ या विषयावर प्रशिक्षण दिले.  एका गटाच्या संस्थाचालक ते स्वतःची इमारत शासनाचा निधी न घेता उभारणे, शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना, पतसंस्था असा प्रवास त्यांनी आपल्या व्याख्यानातून उलगडला. ‘माविम’च्या जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे यांनी मार्गदर्शन केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा