ताडी विक्री दुकानांचा ई- लिलाव जाहीर
ताडी विक्री दुकानांचा ई- लिलाव जाहीर
अकोला, दि. 18 : जिल्ह्यातील ताडी विक्री दुकानांचा ई- लिलाव जाहीर
करण्यात आला असून, इच्छूकांनी अर्ज करण्याचे
आवाहन करण्यात आले आहे.
ताडी दुकानांचा जाहीरनामा ‘महाटेंडर्स’ ( www.mahatenders.gov.in ) या संकेतस्थळावर दि. २६ सप्टेंबरपर्यंत उपलब्ध राहील.
तसेच ताडी दुकानांसाठी निविदा व दि. ३० सप्टेंबर रोजी लिलावात भाग घेण्यासाठी याच संकेतस्थळाचा
वापर बोलीधारकांनी करावा. ई- लिलाव नि - निविदा पध्दत नवीन असल्याने काही शंका किंवा
माहिती हवी असल्यास अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अकोला या कार्यालयात संपर्क साधावा.
लिलावाची माहिती इच्छुकांनी संकेतस्थळावर पाहावी. ई-लिलाव -नि- निविदेच्या प्रक्रियेसंदर्भातील
सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांनी राखुन ठेवलेले आहेत.
000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा