गृहनिर्माण संस्थांना अभिहस्तांतरण आवश्यक - डीडीआर डॉ. प्रवीण लोखंडे
अकोला, दि. ११ : अपार्टमेंटमध्ये सदनिका किंवा सोसायटीत घर घेतल्यानंतर अनेकजण कायदेशीर प्रक्रियेची फारशी माहिती घेत नाहीत. अशा मिळकतींचे अभिहस्तांतरण आवश्यक असून, सर्व गृहनिर्माण संस्थांनी ते करून घेण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी केले.
जिल्ह्यातील पहिल्या मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया नुकतीच झाल्याचे डॉ. लोखंडे यांनी सांगितले. जिल्ह्यात 100 वर गृहनिर्माण संस्था असून, त्यापैकी ४० संस्था सदनिकाधारक किंवा गाळेधारकांच्या आहेत, मात्र या सोसायट्यांनी अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेयन्स) केलेले नाही. सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या बाबतीत अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेयन्स) अत्यंत महत्त्वाचे आहे.
अभिहस्तांतरण म्हणजे काय?
संस्थेच्या नावावर जमिनीची थेट मालकी हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेस मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेयन्स) म्हणतात. विकासक सहकार्य करत नसेल तर सदर प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडुन एकतर्फी पूर्ण करता येते. याद्वारे मालमत्ता विकासकाकडून सहकारी गृहनिर्माण सोसायटीला मालमत्तेची कायदेशीर मालकी मिळू शकते. सोसायटीला पुनर्विकासाचे पूर्ण अधिकार मिळतात. सर्वच हक्क सोसायटीकडे गेल्याने जमीन मालकाला किंवा विकासकाला पुन्हा त्या जमिनीवर दावा करता येत नाही.
केल्याने मिळतात फायदे
मानीव अभिहस्तांतरण संस्थेने न केल्यास पुनर्विकासामध्ये जुनी इमारत पाडून नवी इमारत बांधताना त्या सदनिकाधारकांना बऱ्याच त्रासाला सामोरे जावे लागते. मानीव अभिहस्तांतरण करुन घेतल्यास वाढीव एफएसआय, पार्किंगचे नियोजन, टेरेसची मालकी, नविन बांधकाम करता येणे, इमारतीचा पुनर्विकास करता येणे हे फायदे मिळतात.
मानीव अभिहस्तांतरण केल्यास पुनर्विकासात वाढीव इमारत चटई क्षेत्र निर्देशांक हा सदनिकाधारकांना मिळणार असल्याने त्याचा संस्थेस फायदा असतो. तसेच, बांधकाम व्यावसायिकाचा त्या जागेवरील हक्क संपतो. सोसायटीच्या स्वायत्त हक्कांसाठी, कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी सोसायटीला मालमत्तेची कायदेशीर मालकी मिळविण्यासाठी डीम्ड कन्व्हेयन्स आवश्यक आहे.
काय कराल?
एकतर्फी डीम्ड कन्व्हेयन्स करुन घेण्यासाठी प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचेकडे दाखल करणे आवश्यक असुन, त्यासोबत सोसायटीचे नोंदणी प्रमाणपत्र, संपुर्ण इमारतीचा लेआऊट, सदस्य यादी, संस्थेची आर्थिक पत्रके, विकासोबतच्या करारनाम्याची प्रत, सातबारा उतारा, मालमत्ता पत्रक इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
प्रक्रिया पूर्ण होण्यास किती कालावधी लागतो?
डीम्ड कन्व्हेयन्सचे प्रकरण अर्धन्यायिक स्वरुपाचे असल्याने ते दाखल झाल्यानंतर सर्व संबंधितांची सुनावणी घेतल्यानंतरच निर्णय दिला जातो. साधारणतः ही प्रक्रिया ३ ते ५ महिने चालल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होते.
जिल्ह्यातील पहिले मानीव अभिहस्तांतरण
अकोला येथील रेणुकानगरातील माँ अन्नपूर्णा सहनिवास अपार्टमेंट गाळेधारक सहकारी संस्थेने जिल्हा उपनिबंधकांकडे प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करुन संस्थेस मानीव अभिहस्तांतरण प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. हे जिल्ह्यातील पहिलेच प्रकरण आहे.
०००

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा