पालकमंत्र्यांकडून नियोजित विकासकामांचा आढावा प्रशासकीय मान्यतांची कार्यवाही तत्काळ पूर्ण करा पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

 









अकोला, दि. ११: जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात अधिकाधिक विकासकामे पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने नियोजित कामांच्या प्रशासकीय कामांच्या मान्यतांची कार्यवाही तत्काळ पूर्ण करावी. मान्यतांअभावी निधी अखर्चित राहता कामा नये, असे निर्देश राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे दिले.

सर्वसाधारण योजनेतील नियोजित विकासकामांबाबत आढावा पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी वर्षा मीना, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर यांच्यासह सर्व यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, मंजूर निधीतून नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळणे व जिल्ह्यात भरीव विकासकामे निर्माण होणे आवश्यक असते. त्यादृष्टीने करण्यात आलेल्या नियोजनानुसार तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यतांची कार्यवाही तत्काळ पूर्ण करावी. जिल्ह्याचा निधी अखर्चित राहता कामा नये. त्यामुळे १५ सप्टेंबरपर्यंत मान्यतांची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, महाऊर्जा, मृद व  जलसंधारण, वैद्यकीय महाविद्यालय, क्रीडा, रोजगार व कौशल्य विकास आदी विविध यंत्रणांची कामे, मान्यता प्रक्रियांची सद्य:स्थिती आदींबाबत पालकमंत्र्यांनी आढावा घेतला.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा