मासेमारी साधनांसाठी खरेदीवर अर्थसाह्य अर्ज करण्याचे आवाहन

 

 

मासेमारी साधनांसाठी खरेदीवर अर्थसाह्य

अर्ज करण्याचे आवाहन

अकोला, दि. 18 : मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना मासळी पकडण्यासाठी लागणा-या साधनांच्या खरेदीवर मत्स्यव्यवसाय विभागाकडून अर्थसाह्य दिले जाते. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन सहायक मत्स्यव्यवसाय अधिकारी प्रि. रा. झोड यांनी केले आहे.

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सर्वसाधारण योजनेतून मासेमारी साधनाच्या खरेदीवर अर्थसहाय्य  दिले जाते. जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेतील सभासदांनी खरेदी केलेल्या नायलॉन सुत, जाळीवर 50 टक्के अनुदान देय आहे. जाळ्याच्या किमतीची कमाल मर्यादा प्रति किलोग्राम 800 रू. आहे व भूजल क्षेत्रातील मत्स्यव्यवसायासाठी नायलॉन तयार जाळी प्रति सभासद 20 किलोग्राम मर्यादेप्रमाणे अनुदान देण्यात येईल.

भुजल क्षेत्रात लहान आकाराच्या होड्या वापरल्या जातात. त्यासाठी जिल्ह्यातील मासेमारी करणाऱ्या मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था यांना बिगर यांत्रिक नौका (लाकडी नौका, पत्रा नौका, फायबर नौका) खरेदीवर प्रकल्प किंमतीच्या 50 टक्के किमान मर्यादेत अनुदान मिळते.

तरी पात्र संस्थांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मासेमारी करणाऱ्या मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी प्रस्तावासोबत संस्थेच्या लेटरहेडवर विनंती अर्ज संस्थेचा ठराव, सभासद मागणी अर्ज, सभासदाचे आधार कार्ड, बँक पासबुकची छायाप्रत किंवा रद्द केलेला धनादेश आदी आवश्यक कागदपत्रे जोडून मत्स्यव्यवसाय विभागात सादर करण्याचे आवाहन केले आहे.

000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा