‘पारंपरिक’च्या तुलनेत मसाला पीकांचे उत्पादन फायदेशीर जिल्हाधिका-यांच्या हस्ते निविष्ठावाटप







‘पारंपरिक’च्या तुलनेत मसाला पीकांचे उत्पादन फायदेशीर

जिल्हाधिका-यांच्या हस्ते निविष्ठावाटप

अकोला, दि. 6 : जिल्ह्यात मसालावर्गीय पीकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी वसंत अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न होत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते म्हैसपूर येथे मसालावर्गीय पीकांच्या निविष्ठांचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यात 720 एकरांवर मसालावर्गीय पीकांची प्रात्यक्षिके राबविण्यात येत आहेत.


 

जिल्ह्यात मसाला पीकांचे क्षेत्र वाढावे व शेतक-यांना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळावे यासाठी तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मिरची व भाजीपाला संशोधन केंद्राच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

अकोला जिल्ह्यात 217 एकरावर काळजिरे, 100 एकरावर सोप, 217 एकरावर ओवा, 50 एकरावर कसुरी मेथी, 100 एकरा धणे अशा एकूण 720 एकरावर प्रात्यक्षिके राबविण्यात येत आहेत. याअनुषंगाने जिल्हाधिका-यांनी म्हैसपूर येथे भेट देऊन शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या हस्ते गुरूवर्य सेंद्रिय उत्पादक गटाचे अध्यक्ष मनोहर रोकडे यांना मसाला पिकांच्या बियाणे निविष्ठावाटप करण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, संशोधन केंद्राचे बियाणे पैदासकार डॉ. श्याम घावडे, विजय शेगोकार, मेघा नागे, शालिनी निखाडे आदी उपस्थित होते.

०००




 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :