दिव्यांगांना कृत्रिम अवयव मिळण्यासाठी मोजमाप व नाव नोंदणी

अकोल्यासह अकोट, मूर्तिजापूरातही शिबिरे

दिव्यांगांना कृत्रिम अवयव मिळण्यासाठी

मोजमाप व नाव नोंदणी

 

अकोला, दि. 11 : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि अल्मिको मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प. समाजकल्याण व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या सहकार्याने दिव्यांगांना विनामूल्य साहाय्यभूत साधने मिळण्यासाठी मोजमाप, नाव नोंदणी शिबिर दि. 16 ते 19 डिसेंबरदरम्यान ठिकठिकाणी होतील.

अकोल्यातील आगरकर विद्यालयात दि. 16 व 17 डिसेंबरला सकाळी 10 ते दु. 4 या वेळेत शिबिर होईल. अकोट येथील पंचायत समिती सभागृह येथे दि. 18 डिसेंबर रोजी, तसेच मूर्तिजापूर येथील पं. स. सभागृहात दि. 19 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दु. 4 शिबिर घेण्यात येईल.

या शिबिरांत मोजमाप व नाव नोंदणी केल्यानंतर एका महिन्या्च्या कालावधीत वाटप शिबिराचे आयोजन केले जाईल. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मोटराईज्ड ट्रायसिकल, ट्रायसिकल, व्हीलचेअर, सीपी चेअर, सुगम्य केन, कुबडी, जोड, मोबाईल, श्रवणयंत्र आदी साधने वाटप केली जाणार आहेत.

जिल्ह्यात यावर्षी दि. 26 व 27 जुलै रोजी शिबिर घेण्यात आले होते. त्या शिबिरात लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना आता होऊ घातलेल्या शिबिरात लाभ मिळणार नाही.

शिबिराला येताना दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, आधारपत्र, युडीआयडी कार्ड, ऑडिओग्राफ (श्रवणयंत्रासाठी), दिव्यांगत्व दिसेल अशी दोन छायाचित्रे आदी कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन जि. प. समाजकल्याण अधिका-यांनी केले आहे.

०००  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :