आदिवासी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा एकलव्य मॉडेल निवासी शाळेत प्रवेशासाठी आवाहन
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाची
शाळा
एकलव्य मॉडेल निवासी शाळेत प्रवेशासाठी
आवाहन
अकोला, दि. 6 :आदिवासी एकात्मिक प्रकल्प
विभागातर्फे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य मॉडेल
निवासी शाळा चालविण्यात येत आहेत. त्यात प्रवेश मिळण्यासाठी स्पर्धा परीक्षा होणार
असून, इच्छूक विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत दि. 1 फेब्रुवारीपूर्वी
अर्ज करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे यांनी केले आहे.
या प्रवेश परीक्षेसाठी इयत्ता पाचवी ते
आठवीचे विद्यार्थी पात्र राहतील. शाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रवेश परीक्षेचे आवेदनपत्र
विद्यार्थ्यांकडून भरून घेऊन प्रकल्प कार्यालयाकडे सादर करावे. विहित नमुन्यातील अर्ज
संबंधित शासकीय, अनुदानित आश्रमशाळेतील मुख्याध्यापक, तसेच प्रकल्प कार्यालयात विनामूल्य
उपलब्ध आहेत. आवेदनपत्रासह सक्षम अधिका-यांनी दिलेल्या वार्षिक उत्पन्नाचा, तसेच पालकांचा,
विद्यार्थ्यांचा जात दाखला जोडणे आवश्यक आहे. प्रवेश परीक्षेसाठी अकोला जिल्ह्यातील
बार्शिटाकळी तालुक्यात कोथळी येथील शासकीय आश्रमशाळा व बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात
घाटबोरी येथील शासकीय आश्रमशाळा ही दोन केंद्रे निश्चित आहेत. परीक्षा दि. 23 फेब्रुवारी
2025 रोजी होईल.
अमरावती विभागात एकात्मिक आदिवासी प्रकल्प
विभागातर्फे अमरावती जिल्ह्यात चिखलदरा येथे एकलव्य निवासी शाळा, नारवाटी येथे एकलव्य
निवासी शाळा, नांदेड जिल्ह्यात सहस्त्रकुंड येथे आणि यवतमाळ जिल्ह्यातील बोटोणी येथे
एकलव्य निवासी शाळा आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा