शासकीय वसतिगृहासाठी जागेचा शोध सुरू
शासकीय वसतिगृहासाठी जागेचा शोध सुरू
अकोला, दि. 6 : सामाजिक न्याय विभागाच्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी अकोला शहरात जागेचा शोध घेण्यात येत आहे. इच्छूक जागामालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन
करण्यात आले आहे.
हे वसतिगृह सध्या हनुमान वस्ती परिसरात आहे. वसतिगृहाची इमारत जीर्ण झाली आहे. इमारतीच्या स्ट्रक्चर
ऑडिट अहवालानुसार इमारत रिकामी करणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरात नव्या जागेचा शोध सुरू
आहे.
वसतिगृहात एकूण 75 विद्यार्थी प्रवेशित
असून, त्यादृष्टीने कार्यालय कक्ष, निवास कक्ष, भोजनकक्ष, स्वच्छतागृह आदी सोयी असलेल्या
इमारतीची आवश्यकता आहे. तरी इच्छूक जागामालकांनी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हनुमान वस्ती, संतोषी मातेच्या
देवळाजवळ, अकोला (मो. क्र. 8308058833) किंवा सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग, निमवाडी,
अकोला येथे संपर्क साधावा.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा