‘महाबीज’कडून भागधारकांना 30 टक्के लाभांश जाहीर गतवर्षी झाली पाच लाख 76 हजार क्विंटल बियाणे विक्री
‘महाबीज’कडून भागधारकांना
30 टक्के लाभांश जाहीर
गतवर्षी झाली पाच लाख 76
हजार क्विंटल बियाणे विक्री
स्व. नानासाहेब सपकाळ यांच्या
तैलचित्राचे अनावरण
अकोला, दि. 24 : राज्यातील शेतक-यांना
चांगले बियाणे रास्त दरात मिळण्याचे उद्दिष्ट बाळगून ‘महाबीज’ची वाटचाल सुरू असून,
2023-24 या वर्षातील खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात एकूण पाच लाख 76 हजार 219 क्विंटल
बियाणे विक्री झाली आहे.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ
(महाबीज) 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा डॉ पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय येथील
डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात शनिवारी झाली, सभेच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी आयुक्त
रावसाहेब भागडे होते. महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, संचालक वल्लभराव
देशमुख, डॉ रणजित सपकाळ, कृषी विद्यापिठाचे प्रतिनीधी विठ्ठल सरप पाटील,शासनाचे प्रतिनिधी
रामदास सिध्दभट्टी, राष्ट्रीय बीज निगमचे हेमंत चिरमूरकर व महाबीजे विभाग प्रमुख उपस्थित
होते.
‘महाबीज’तर्फे 2023-24 या वर्षात
सुमारे पावणेसहा क्विंटल बियाणे विक्री झाली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात महाबीजची
एकूण आर्थिक उलाढाल 537 कोटी 74 लक्ष रुपये आहे. महाबीजच्या इतिहासातील सर्वाधिक 30
टक्के लाभांश भागधारकांना जाहीर करण्यात आला. तसेच महाराष्ट्र शासनाकडे मागील तीन वर्षांपासून
शासनाकडून थकित असलेले ३३.८७ कोटी बीजोत्पादन अनुदानाबाबतचे काम मार्गी लागल्याबाबत
महाबीजच्या भागधारकांनी समाधान व्यक्त केले.
सभास्थळी महाबीजच्या वतिने भागधारकांना
महाबीज कृषी उत्पादनांची माहिती होण्याकरिता विविध दालने थाटण्यात आली होती. त्यामध्ये
ऊती संवर्धित केळी, संकरित पपई, मका, चारा पिके खरिप/रब्बी हंगामातील पिक बाण, भाजीपाला
वियाणे व प्रात्यक्षीक व माहिती सादर करण्यात आली.
व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर
आणि आयुक्त (कृषी) रावसाहेब भागडे यांनी बीजोत्पादक भागधारकांच्या समस्या जाणून घेतल्या.
संचालक वल्लभराव देशमुख व संचालक डॉ रणजीत सपकाळ यांनी भागधारकांच्या समस्येवर मार्गदर्शन करुन बीजोत्पादक भागधारकांचे समाधान
केले संचालन जितेंद्र सरोदे यांनी केले तर आभार विवेक ठाकरे (महाव्यवस्थापक उत्पादन)
यांनी मानले.
स्व . सपकाळ यांच्या तैलचित्राचे
अनावरण
महाबीजभवन येथे राज्याचे तत्कालीन
कृषी राज्यमंत्री महाबीजचे प्रथम अध्यक्ष स्व. नानासाहेब सपकाळ यांच्या तैलचित्राचे
अनावरण करण्यात आले. खासदार अनुप धोत्रे, जिल्हा
मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष कोरपे, आयुक्त (कृषी) रावसाहेब भागडे, महाबीजचे व्यवस्थापकीय
संचालक योगेश कुंभेजकर, महाबीज भागधारकांचे संचालक वल्लभराव देशमुख, डॉ रणजीत सपकाळ
व महाबीज विभागप्रमुख उपस्थित होते.
सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल
राज्यातील शेतकऱ्यांना चांगल्या
प्रतीचे बियाणे रास्त भावात उपलब्ध व्हावे याकरीता महाबीजची स्थापना २८ एप्रिल, १९७६
रोजी करण्यात आली. महाबीजच्या रुपाने लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर होऊन भारतातील
सर्व राज्य बियाणे महामंडळामधील अग्रगण्य राज्य बियाणे महांडळ म्हणून मागील ४ दशकांपेक्षा
जास्त कालावधीपासून शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी अविरत कार्य करत आहे. पुढील वर्षात
महाबीज सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा