सैन्याधिकारी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी विनामूल्य प्रशिक्षण

 

सैन्याधिकारी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी विनामूल्य प्रशिक्षण

अकोला, दि. 31 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी संयुक्त संरक्षण सेवा (सीडीएस) या परीक्षेची पूर्वतयारी नाशिकच्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात करून घेतली जाते. त्यासाठी संकेतस्थळावर रीतसर अर्ज करून 10 जानेवारी रोजी मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी 20 जानेवारी ते 4 एप्रिल या कालावधीत सीडीएस अभ्यासक्रमाची क्र. 64 व्या तुकडीचे प्रशिक्षण होईल. प्रशिक्षणार्थीच्या निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची विनामूल्य सोय आहे.

निवड प्रक्रिया

सैनिक कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर सीडीएस अभ्यासक्रमासाठी आवेदन अर्ज करावा किंवा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने उपलब्ध करून दिलेले प्रवेशपत्र व संबंधित दस्तऐवज मुलाखतीस सोबत आणावेत. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात शुक्रवार, दि. 10 जानेवारी रोजी मुलाखत होईल.

उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा, उमेदवार हा लोकसंघ आयोग ( यूपीएससी) यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या (सीडीएस) या परीक्षेकरीता ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

येथे संपर्क साधा

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक संपर्क (0253) 2451032 किंवा 9156073306 किंवा training.pctcnashik@gmail.com या ई-मेलवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिका-यांनी केले. 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :