संविधानदिनानिमित्त 75 व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्रांचे ऑनलाईन वाटप
संविधानदिनानिमित्त 75 व्यक्तींना
जात वैधता प्रमाणपत्रांचे
ऑनलाईन वाटप
अकोला, दि. जिल्हा जात प्रमाणपत्र
पडताळणी समितीतर्फे संविधानदिनानिमित्त आयोजित त्रुटी पूर्तता शिबिरात 75 व्यक्तींना
जात वैधता प्रमाणपत्राचे ऑनलाईन वाटप करण्यात आले.
सामाईक परीक्षेनंतर उच्च शिक्षण
व व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असते.
हे लक्षात घेऊन या कामाला गती देण्यासाठी समितीतर्फे संविधानदिनानिमित्त त्रुटी पूर्तता
शिबिर राबविण्यात आले. समितीचे अध्यक्ष शरद कुलकर्णी, उपायुक्त व सदस्य अमोल यावलीकर,
सदस्य सचिव मनोज मेरत यांच्या मार्गदर्शनात ही प्रक्रिया पार पडली.
प्रलंबित अर्जांची छाननी करण्यात
येऊन अर्जात त्रुटी आढळलेल्या अर्जदारांशी संपर्क साधण्यात आला व त्यांच्याकडून आवश्यक
कागदपत्रे मिळवून सर्व त्रुटींची पूर्तता करून घेण्यात आली. शिबिराला अर्जदारांनी उत्तम
प्रतिसाद दिला व एकूण 75 व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्रांचे ऑनलाईन वाटप करण्यात
आले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा