एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात सात बाबींसाठी मोठे अनुदान अधिकाधिक शेतक-यांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात

सात बाबींसाठी मोठे अनुदान

अधिकाधिक शेतक-यांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

अकोला, दि. 30 : सन 2024-25 करीता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात शीतगृह, शीतखोली, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, एकात्मिक पॅक हाऊस, रेफर व्हॅन,  रायपनिंग चेंबर, पूर्व शीतकरण गृह अशा सात बाबींसाठी मोठे अनुदान दिले जाते. जिल्ह्यातून अधिकाधिक शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

 

बाब व अनुदान पुढीलप्रमाणे : शीतगृह- प्रकल्प खर्च 8 ते 10 हजार  प्रति मे.टन (5 हजार मे.टन क्षमतेसाठी) जास्तीत जास्त देय अनुदान 1 कोटी 75 लक्ष रू. आहे. अर्थसहाय्य स्वरूप किंमतीच्या 35 टक्के (बँक कर्जाशी निगडित), शीतखोली- प्रकल्प खर्च 15 लक्ष प्रति युनिट (30 मे. टन क्षमतेसाठी) अनुदान जास्तीत जास्त 5 लक्ष 25 हजार रूपये, अर्थसहाय्य स्वरूप किंमतीच्या 35 टक्के (बँक कर्जाशी निगडीत).

प्राथमिक प्रक्रिया केंद्र- प्रकल्प खर्च 25 लक्ष प्रति युनिट, जास्तीत जास्त देय अनुदान 10 लक्ष रू., अर्थसहाय्य स्वरूप किंमतीच्या 40 टक्के (बँक कर्जाशी निगडीत), एकात्मिक पॅक हाऊस- प्रकल्प खर्च 50 लक्ष प्रति युनिट, जास्तीत जास्त देय अनुदान 17.50 लक्ष रू., अर्थसहाय्य स्वरूप किंमतीच्या 35 टक्के (बँक कर्जाशी निगडीत).

 शीतवाहन/रेफर व्हॅन- 26 लक्ष प्रति युनिट (9 मे.टन क्षमतेसाठी), जास्तीत जास्त देय अनुदान 9 लक्ष 10 हजार रू., अर्थसहाय्य स्वरूप किंमतीच्या 35 टक्के (बँक कर्जाशी निगडीत), रायपनिंग चेंबर- प्रकल्प खर्च 1 लक्ष प्रति मे.टन (300 मे.टन क्षमतेसाठी), जास्तीत जास्त देय अनुदान 105 लक्ष, अर्थसहाय्य स्वरूप किंमतीच्या 35 टक्के (बँक कर्जाशी निगडीत).

 पूर्व शीतकरण गृह- प्रकल्प खर्च 25 लक्ष रूपये (6 मे.टन क्षमतेसाठी), जास्तीत जास्त देय अनुदान 8.75 लक्ष रू., अर्थसहाय्य स्वरूप किंमतीच्या 35 टक्के (बँक कर्जाशी निगडीत) इतके आहे.

        योजनेत लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकरी, उद्योजक यांनी http://mahadbt.maharashtra.gov.in या कृषी विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे. या योजनेत वैयक्तिक शेतकरी, उद्योजक यांना लाभ घेता येईल.

        संकेतस्थळावर पूर्वसंमतीसाठी घटकांर्गत लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास अर्जाची निवड ऑनलाईन लॉटरी पध्दतीने करण्यात येईल. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत प्रकल्पाधारित योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एस. किरवे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :