युवकांनी जिल्हा युवा महोत्सवात सहभागी व्हावे प्रशासनाचे आवाहन

 

युवकांनी जिल्हा युवा महोत्सवात सहभागी व्हावे

प्रशासनाचे आवाहन

अकोला, दि. 2 : विविध क्षेत्रात कामगिरी करणारे स्थानिक युवक, कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सव श्री शिवाजी महाविद्यालयात दि. 4 डिसेंबर रोजी होणार आहे. अधिकाधिक युवकांनी सहभागी व्हावे.  अर्ज मंगळवारी (3 डिसेंबर) दुपारी 4 वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी केले.

संकल्पनेवर आधारित स्पर्धेत सांघिक/वैयक्तिक-  विज्ञान व तंत्रज्ञान या मधील नव संकल्पना, सांस्कृतिकलोकगीत, समुह लोकनृत्य आणि कौशल्य विकास -कथा लेखन, चित्रकला, वक्तृत्व, कविता, युथ आयकॉन- वक्तृत्व स्पर्धेसाठी रोबोटिक्स आणि ऑटोमेशन : भविष्याला आकार देणारे नवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा दैनंदिन जीवनातील प्रभाव किंवा विज्ञान व तंत्रज्ञान यातील नव संकल्पना आदी विषय आहेत.

 कथा लेखन स्पर्धेसाठी एक्स्प्लोरिंग द सोलर सिस्टीम  (सौर मंडळाचा शोध),  साधारण यंत्रांचे चमत्कार किंवा विज्ञान व तंत्रज्ञान या मधील नवसंकल्पना आदी विषय आहेत.

युवा महोत्सवात सहभागासाठी वय 15 ते 29 वर्षे दरम्यान असावे. जन्मतारखेचा दाखला, आधारकार्ड प्रत, बोनाफाईड प्रमाणपत्राची सत्यप्रत आवश्यक आहे.  

कला प्रकारात सहभागी कलाकारांना आवश्यक ते साहित्य स्वतः उपलब्ध करुन घ्यावे लागेल. संयोजकांमार्फत व्यासपीठ, वीज आदी व्यवस्था असेल. 

  

युथ आयकॉनयुवक कल्याण क्षेत्रात तसेच युवांना प्रभावित करणारे कार्य केलेले 15 ते 29 वर्षाआतील युवक व युवतींना यामध्ये सहभागी होता येईल.राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य, शिक्षण, प्रौढशिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा ,मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रुण, व्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वागीन विकासासाठी केलेले कार्य, साहस इत्यादी बाबतचे कार्यक्षेत्रामध्ये युवक युवती यांनी केलेल्या प्रेरणादायी माहिती अंदाजे दोन हजार शब्दांत नाव व पत्ता, ई मेल आयडी व संपर्क क्र. सह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला कळवावा.

त्याचप्रमाणे, विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगअंतर्गत युवांना सहभागी होणे करिता विकसित भारतासाठी तंत्रज्ञान, विकसित भारतासाठी तरूणाईला बळ, जगात भारताला स्टार्टअपची राजधानी बनवणे, देशाला जागतिक उत्पादननिर्मिती  पॉवरहाऊस बनविणे आदी विषयांवर सादरीकरण करता येईल. माय भारत पोर्टलवर 5 डिसेंबरपर्यंत सामान्य ज्ञान व भारताची कामगीरी या बाबींवर प्रश्नमंजुषा होणार आहे. या करिता शाळा व कॉलेज यांनी माय भारत पोर्टलवर सहभाग नोंदवावा.

विकसीत भारत याविषयी निबंध लेखन स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने दि. 8 ते 15 डिसेंबर, 2024 या कालावधीत होणार आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला येथे संपर्क साधावा.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :