जिल्हाधिकारी कार्यालयात मानवी हक्क दिन साजरा
अकोला, दि. 10 : जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात झाला.
हा दिवस दरवर्षी १० डिसेंबर रोजी साजरा केला जातो. १९४८ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा स्वीकारली. तेव्हापासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. याबाबत ॲड. संदीप कंकाळ यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी मानवाधिकार जाहीरनाम्याचे वाचन करण्यात आले. सामाजिक न्याय संरक्षण संघाचे अध्यक्ष ॲड. विजयकुमार गडलिंगे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे श्याम धनमाने, ॲड. संदीप कंकाळ, पंजाबराव वर यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते
०००

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा