शिष्यवृत्ती योजनेच्या अनुषंगाने शुक्रवारी प्राचार्यांची कार्यशाळा
शिष्यवृत्ती योजनेच्या अनुषंगाने शुक्रवारी प्राचार्यांची
कार्यशाळा
अकोला, दि 3: शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज
महाडीबीटी संकेतस्थळावर भरून घेणे, तसेच प्रलंबित अर्ज निकाली काढण्याच्या दृष्टीने
समाजकल्याण सहाय्यक आयुक्तांच्या उपस्थितीत महाविद्यालयाच्या प्राचार्यांची कार्यशाळा
दि. 6 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे होणार
आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील
विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर
शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृती,व्यावसायिक
पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन व व्यवसाय प्रशिक्षण
शुल्क प्रतिपूती योजना राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ व व्यावसायिक महाविद्यालयांचे २०२४- २५
या शैक्षणिक वर्षाचे महाडीबीटी पोर्टलवरील सद्य:स्थितीचे अवलोकन केले असता अनुसूचित
जाती प्रवर्गाचे ७ हजार ८५९ अर्ज आतापर्यंत भरण्यात आले असून महाविद्यालयस्तरावर अद्याप
४ हजार ६२३ अर्ज प्रलंबित आहेत. ते निकाली काढण्याच्या अनुषंगाने ही कार्यशाळा आयोजित
केली आहे. कार्यशाळेत प्राचार्यांनी सहभागी होण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण डॉ. अनिता राठोड यांनी
केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा