वस्तू व सेवा कर अभय योजनेत व्याज व दंडाची संपूर्ण माफी; राज्यकर सहआयुक्त श्री संजय पोखरकर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

 





अकोला,दि.०७ डिसेंबर २०२४; "वस्तू व सेवा कर अभय योजना २०२४" ही वस्तू व सेवा कर कायद्याअंतर्गत निर्धारणा आदेश पारित करण्यात आलेल्या व्यापाऱ्यांनी थकीत मुळ करांचा भरणा केला,तर त्यांना त्या करावरील व्याज आणि विलंब आकाराची संपूर्ण माफी देणारी असल्याने ,जिल्ह्यातील जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याची आवाहन राज्यकर सहआयुक्त संजय पोखरकर यांनी केले.
       
       अकोला राज्य व वस्तू सेवा कार्यालय आणि सी.ए.असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला आय.सी.ए.आय.भवन येथे वस्तू व सेवा कर अभय योजना २०२४ संबंधीत आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यावेळी वस्तू व सेवा कर उपायुक्त डॉ.अर्चना चव्हाण, अध्यक्ष आयसीएआय सुमित अलीलचंदानी,सिमा बाहेती आणि रितेश मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीसह  अकोला राज्य वस्तू व सेवा कर कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी आणि आय.सि.ए.आय. चे सदस्य उपस्थित होते.

         परिसंवादात बोलतांना सहायक राज्यकर आयुक्त प्रविण भोपळे यांनी अभय योजनेच्या तरतूदी आणि प्रक्रीया बाबत माहिती दिली.तसेच रितेश मेहता यांनी कायदेशीर तरतूदीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.परिसंवादाच्या यशस्वीतेसाठी तुषार लांडगे,सचिन लव्हाळे,चुडे आणि निवृत्ती राऊतांनी यांनी प्रयत्न केले.

      ३१ मार्च २०२५ पर्यंतच थकीत कराचा भरणा करणे या अभय योजनेत बंधनकारक आहे. ही योजना वर्ष २०१७-१८, २०१८ - १९ आणि २०१९- २० या कालावधीमध्ये कराचा भरणा न झालेल्या आणि निर्धारणा आदेश पारित झालेल्यांना लागू राहणार आहे.
==========
बॉक्स
अभय योजना आणि योजनेचे फायदे-

१.जुलै २०१७ ते मार्च २०२० या कालावधीत पारित निर्धारणा आदेशांचा समावेश

२. मुळ कराची रक्कम भरली,तर व्याज व विलंब आकाराची संपूर्ण माफी

३. योजनेअंतर्गत ३१ मार्च २०२५ च्या आधी थकीत कराची रक्कम भरणे आवश्यक
==================

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :