जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचे पोर्टल सुरू

 जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचे पोर्टल सुरू

 

अकोला, दि. 30 : जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना पोर्टलचा वापर करून ॲडमिशन कार्ड डाऊनलोड करता येतील. तसे पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

 

जिल्ह्यातून या परीक्षेसाठी 6 हजार 967 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. ही परीक्षा एकूण 25 केंद्रांवर होईल.

पोर्टलचा पत्ता https://cbseitms.rcil.gov.in/nvs/admincard असा असून, विद्यार्थ्यांना अर्ज करताना मिळालेला रजिस्ट्रेशन क्रमांक हा आयडी म्हणून व जन्मतारीख पासवर्ड म्हणून वापरून परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल.

परीक्षार्थ्यांनी दि. 18 जानेवारी रोजी सकाळी 10. 15 वा. परीक्षा केंद्रावर पोहोचावे. सोबत प्रवेशपत्र, निळा किंवा काळा बॉलपेन, आधारपत्र किंवा शासनमान्य निवासी दाखल्याची छायांकित प्रत आदी कागदपत्रे सोबत असावीत.

 अधिक माहितीसाठी विद्यालयाशी (0724) 2991087 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य आर. एस. चंदनशिव यांनी केले.

०००


--

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :