जिल्हा प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

 

 

जिल्हा प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

 










उत्तम सेवा मिळणे हा ग्राहकाचा अधिकार

अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी

 

अकोला, दि. 24 : ग्राहक संरक्षण कायद्यानुसार उत्तम सेवा मिळणे हा ग्राहकाचा अधिकार असून, आस्थापनांनी ग्राहकाभिमुख होण्याची गरज आहे, असे अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांनी आज येथे सांगितले.  

जिल्हा प्रशासन व जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रम नियोजनभवनात झाला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी निखिल खेमनार,सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना निमजे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नीलिमा बेलोकर, ग्राहक संरक्षण संघाचे अध्यक्ष श्रीराम ठोसर ,ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष मनजीत देशमुख, प्रवासी ग्राहक संघाचे अध्यक्ष आर.डी.अहिर, कंझ्युमर प्रोटेक्शन फोरमचे श्री.पाठक यांच्यासह ग्राहक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते

 

श्री. सिद्धभट्टी म्हणाले की, ग्राहकाला सुरक्षिततेचा, आपले म्हणणे मांडण्याचा, माहिती मिळण्याचा, निवड करण्याचा,तक्रार व निवारण करून घेण्याचा, तसेच व हक्कांबाबत शिक्षणाचा अधिकार कायद्याने दिला आहे. विविध सार्वजनिक, खासगी आस्थापनांनी ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवूनच कार्य करणे आवश्यक आहे. 

श्री. कुलकर्णी म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध ग्राहक सेवा एका क्लिकवर आल्या असून ग्राहकांना कालबद्ध सेवा पुरवणे ही प्रत्येक आस्थापनेची जबाबदारी आहे. ग्राहक दिन सोहळ्यात तृतीयपंथी समुदायाचे गुलाम राजिक गुलाम आबिद यांना शिधापत्रिका वितरीत करण्यात आली. खंडोजी शिरसाट यांनी शाहिरी कार्यक्रम सादर करून ग्राहक संरक्षणाचा संदेश दिला. अर्चना उस्केल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :