आता सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट
आता सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट अकोला, दि. 31 : वाहनांवरील नंबरप्लेटमध्ये छेडछाड, बनावट प्लेट आदी प्रकारांना आळा घालण्यासाठी आता सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. वाहनधारकांनी संबंधित पोर्टलवर बुकिंग करून नंबरप्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिका-यांनी केले आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 अन्वये शासनाकडून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट (एचएसआरपी) बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. वाहनांना नंबरप्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणा-या वाहनांची ओळख पटविणे, तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट बसविण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अकोला जिल्ह्यासाठी या कामासाठी मेसर्स एफटीए एचएसआरपी सोल्युशन्स प्रा. लि. ही एजन्सी निश्चित करण्यात आली आहे. नंबरप्लेटच्या बुकिंगसाठी https://maharashtrahsrp.com हे पोर्टल निश्चित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी पोर्टलवर बुकिं...