स्वाधार योजनेच्या अर्जांची त्रुटी पुर्ततेसाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदत
स्वाधार योजनेच्या अर्जांची त्रुटी पुर्ततेसाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदत शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती तथा नवबौध्द घटकातील इयत्ता 11 वी 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यवसायिक व बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणुन भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत्: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याकरिता शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे. भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन 2025-2026 या शैक्षणिक सत्रातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अर्जांमध्ये आढळलेल्या त्रृटींची पूर्तता करण्याबाबत यापूर्वी वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत.मात्र काही विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत अर्जांतील त्रृटीपूर्तता केलेली नाही.अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ...