पोस्ट्स

राज्यस्तरीय पराक्रम दिन स्पर्धांसाठी सहभागाचे आवाहन

  राज्यस्तरीय पराक्रम दिन स्पर्धांसाठी सहभागाचे आवाहन अकोला, दि. 4 : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त १८ ऑगस्ट हा दिवस राज्यभर 'पराक्रम दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व आणि रिल्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून शालेय, महाविद्यालयीन तसेच खुल्या गटातील विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे. पराक्रम दिनाच्या नियोजनासाठी अमृत संस्थेने इतिहास अभ्यासकांचा समावेश असलेली समिती स्थापन केली आहे. या स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आल्या आहेत. निबंध स्पर्धेत स्पर्धकांनी सुमारे १ हजार शब्दांचा निबंध अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करायचा आहे. निबंध लेखनासाठी संकेतस्थळावरील संदर्भ पुस्तके, लिंक्स आणि माहिती पुस्तिकेचाच आधार घेणे आवश्यक असून परीक्षकांचा निर्णय अंतिम राहिल. वक्तृत्व स्पर्धेसाठी स्पर्धकांनी स्वतःचा ...

तृतीयपंथीयांसाठी शिष्यवृत्ती व बीजभांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

  तृतीयपंथीयांसाठी शिष्यवृत्ती व बीजभांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन अकोला, दि. ४ : सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्या 'सपोर्ट फॉर मार्जिनलाईज्ड इंडिव्हिज्युअल्स फॉर लाईव्हलीहुड अँड एंटरप्राइज (स्माईल) या केंद्रीय क्षेत्र योजनेअंतर्गत तृतीयपंथीयांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तसेच स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीजभांडवल योजना राबविण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. योजनेचे निकष, अटी व लाभाचे स्वरूप : शासनमान्य अथवा खासगी शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये इयत्ता नववीपासून पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. अर्जदार हा भारतीय नागरिक असणे तसेच सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या राष्ट्रीय तृतीयपंथी पोर्टलवरून जारी करण्यात आलेले तृतीयपंथी ओळख प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी https://transgender.dosje.gov. in या राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज सादर करावा. शिष्यवृत्तीची संख्या मर्यादित असल्याने मागील शैक्षणिक वर्षातील गुणांच्या आधा...

रेल्वे पोलीस स्टेशन, अकोला येथील जप्त मुद्देमालाचा १० ऑगस्ट रोजी जाहीर लिलाव

  रेल्वे पोलीस स्टेशन, अकोला येथील जप्त मुद्देमालाचा १० ऑगस्ट रोजी जाहीर लिलाव अकोला, दि. ४ : रेल्वे पोलीस स्टेशन, अकोला येथे विविध गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल दीर्घकाळापासून मालखान्यात ठेवण्यात आलेला आहे. संबंधित मुद्देमालाच्या मूळ मालकांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र, आजपर्यंत मूळ मालकांचा शोध लागलेला नसल्याने सदर मुद्देमालाची नियमानुसार विल्हेवाट लावण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबत न्यायालय तसेच उपविभागीय दंडाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला असून त्यांच्या आदेशानुसार संबंधित मुद्देमालाची नियमानुसार विल्हेवाट लावण्यासाठी जाहिर लिलाव आयोजित करण्यात आला आहे. त्यानुसार सोमवार, दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता रेल्वे पोलीस स्टेशन, अकोला येथे सोबतच्या यादीतील मुद्देमालाचा जाहिर लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावात इच्छुक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रेल्वे पोलीस स्टेशन, अकोला यांच्या वतीने करण्यात आले आहे. --

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे शक्य झाले यकृत प्रत्यारोपण पत्नीच्या यकृतदानातून पतीला मिळाले नवजीवन

  मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे शक्य झाले यकृत प्रत्यारोपण पत्नीच्या यकृतदानातून पतीला मिळाले नवजीवन अकोला दि.4 :  आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. उपचारासाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपयांची आवश्यकता असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीमुळे अकोला येथील प्रशांत इंगळे (वय ४७) यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत त्यांच्या पत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करून पतीला नवजीवन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून प्रशांत इंगळे यांच्यासाठी २ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे टाटा ट्रस्टकडून १९ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक मदतही उपलब्ध झाली. त्यामुळे एकूण २१ लाख ६० हजार रुपयांचा निधी उभारला गेला आणि अत्यंत खर्चिक असलेले यकृत प्रत्यारोपण शक्य झाले. प्रशांत ...

बीएलओंना परिपूर्ण माहिती देऊन सहकार्य करा मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी निखिल खेमनार यांचे आवाहन

    बीएलओंना परिपूर्ण माहिती देऊन सहकार्य करा मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी निखिल खेमनार यांचे आवाहन अकोला, दि. ३० : 'विशेष सखोल पुनरिक्षण' कार्यक्रमात नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याबरोबरच नावातील चूक दुरूस्त करणे, मयत/स्थलांतरित व्यक्तीची नावे वगळणे यासारखी महत्त्वाची कामे केली जात आहेत. त्यामुळे तपशीलात विसंगती आढळली तर चिंतेचे कारण नाही. बीएलओंना योग्य माहिती देऊन यादी निर्दोष करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी निखिल खेमनार यांनी केले.     तफावत/विसंगती म्हणजे काय?   मतदार यादीतील डेटाची 2002-2004 च्या जुन्या मतदार डेटाशी तुलना करताना सिस्टीमद्वारे काही लॉजिकल विसंगती   शोधल्या जातात, त्यालाच तफावत/विसंगती असे म्हणतात.   प्रामुख्याने खालील बाबी यात येतात नावातील स्पेलिंगच्या चुकाः- जुन्या रेकॉर्ड आणि सध्याच्या माहितीत नावाचे स्पेलिंग वेगळे असणे. वय आणि नातेसंबंधातील तफावतः आई-वडील आणि अपत्याच्या वयात अस्वाभाविक अंतर असणे (उदा. 15 वर्षापेक्षा कमी किंवा 45 वर्षापेक्षा जास्त फरक ...

अकोला (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात शाळा ८ ऑगस्टपर्यंत सकाळच्या सत्रात भरणार

    अकोला (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात शाळा ८ ऑगस्टपर्यंत सकाळच्या सत्रात भरणार अकोला, दि. ३०:  मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत कार्यरत मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांना निवडणूक कामकाज सुलभपणे पार पाडता यावे यासाठी ३०-अकोला (पश्चिम) विधानसभा मतदारसंघातील संबंधित शाळा ८ ऑगस्टपर्यंत सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा मीना यांनी दिले आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. याअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून ८ ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मतदारांचे गणना पत्रक भरून घेण्याची कार्यवाही होत आहे. नियुक्त केलेले बहुतांश बीएलओ हे शिक्षक संवर्गातील असल्याने, त्यांना या कामासाठी पुरेसा वेळ मिळावा याकरिता अकोला जिल्ह्यातील शाळा यापूर्वी ३० जुलैपर्यंत सकाळी ७.०० ते दुपारी १.०० या वेळेत भरवण्यात आल्या होत्या. अकोला (पश्चिम) विधानसभा मतदारसंघातील काम विहित मुदतीत पूर्ण करणे सुलभ व्हावे म्हणून या मतदार संघातील ज्या शाळांचे शिक्षक बी...

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

इमेज
      स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा अकोला, दि. ३० : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वा. मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. त्याअनुषंगाने संबंधित सर्व विभागांनी आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, तहसीलदार कुणाल झाल्टे, सा. बां. वि. कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, समारंभाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता, सुशोभीकरण, आवश्यक दुरूस्त्या वेळेत पूर्ण करून घ्याव्यात. शासकीय इमारतींवर आकर्षक रोषणाई व परिसर स्वच्छ ठेवा. शालेय शिक्षण विभागामार्फत विविध स्पर्धा, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन व्हावे. मुख्य कार्यक्रमाच्या दृष्टीने पथकांचा आवश्यक सराव व्हावा. उपस्थितांसाठी कार्यक्रम स्थळी बैठक व्यवस्था, पेयजल, वैद्यकीय...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना पत्र-परिषद नोट

इमेज
  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना  उर्वरित याद्या लवकरच जाहीर होणार   - जिल्हाधिकारी वर्षा मीना §  पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन   अकोला, दि. ३० : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची  पहिली यादी जाहीर झाली असून, उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा गतिमान झाली आहे. पात्र शेतक-यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रांनाही निर्देश देण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे सांगितले. योजनेच्या अंमलबजावणीची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी पत्र-परिषद आज झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा उपनिबंधक गीतेशचंद्र साबळे, अभय कटके, तालुका उपनिबंधक ज्योती मलिये आदी उपस्थित होते. प्रत्येक पात्र लाभार्थ्याच्या कर्ज खात्याला विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. त्याआधारे ॲग्र...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या उर्वरित याद्या लवकरच जाहीर होणार – मंत्री बाबासाहेब पाटील पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

इमेज
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या उर्वरित याद्या लवकरच जाहीर होणार – मंत्री बाबासाहेब पाटील पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन मुंबई, दि. २९ : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ज्या शेतकऱ्यांची नावे जाहीर झालेल्या यादीत नाहीत, त्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ५६ लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. आतापर्यंत १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ७.०३ लाख शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे, तर ९.९३ लाख शेतकरी व्यापारी व राष्ट्रीयकृत बँकांचे असू...

'जय महाराष्ट्र' आणि 'दिलखुलास' कार्यक्रमात कामगारमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांची विशेष मुलाखत

इमेज
           कामगार हित , नवीन कामगार नियमावली आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा ' जय महाराष्ट्र ' आणि ' दिलखुलास ' कार्यक्रमात कामगारमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांची विशेष मुलाखत   मुंबई , दि. २९ : राज्यातील कामगारांचे हक्क , सुरक्षितता , सामाजिक संरक्षण आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधत महाराष्ट्राला अधिक कामगारहितैषी व उद्योगस्नेही राज्य बनविण्याच्या राज्य शासनाच्या प्रयत्नांचा वेध घेणारी कामगारमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ' जय महाराष्ट्र ' आणि ' दिलखुलास ' या लोकप्रिय कार्यक्रमांमधून प्रसारित करण्यात येणार आहे.   ' कामगार हित , नवीन कामगार नियमावली आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा ' या विषयावरील या विशेष संवादामध्ये नवीन कामगार नियमावलीची अंमलबजावणी , कामगार कल्याणकारी योजनांचा विस्तार , बांधकाम कामगारांचे कल्याण , गिग वर्कर्सचे सामाजिक संरक्षण , महिला कामगारांचे सक्षमीकरण , कामगारांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येणारे उपाय , वेतन प्रक्रियेतील पारदर्शकता , उद्योगस्नेही वातावरण निर्मिती तसेच...